कोरोना आटोक्यात आल्यामुळे जिल्हाधिकाऱयांचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव आटोक्यात आल्यामुळे जिल्हय़ातील पर्यटनस्थळांवर नागरिकांना केलेली प्रवेशबंदी उठविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी यासंबंधीचा आदेश लागू केला आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन गोकाक फॉल्स, गोडचीनमल्की, राजहंसगडसह वेगवेगळय़ा पर्यटनस्थळांवर नागरिकांना प्रवेशबंदीचा आदेश दिला होता. यापूर्वीचा आदेश त्वरित मागे घेण्यात आला असून आता पर्यटनस्थळांवर नागरिकांना प्रवेश मिळणार आहे. मात्र पर्यटनाचा आनंद लुटताना सरकारी मार्गसुचीचे पालन करावे लागणार आहे.
दरम्यान याबरोबरच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुमारे 400 जणांना भाग घेण्यास आता मुभा देण्यात आली आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना आटोक्मयात आला आहे. यापूर्वी लग्न व इतर कार्यक्रमांत नागरिकांच्या उपस्थितीबाबत निर्बंध घालण्यात आले होते. आता 400 जणांना भाग घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख, मनपा आयुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींची परवानगी घ्यावी लागणार आहे.









