सावंतवाडी / वार्ताहर:
सावंतवाडी शहरात हेल्थ फार्म व गार्डनमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांबाबत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार राजाराम म्हात्रे आहेत. समिती उद्या शनिवारी एकात्रित घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहे. या अगोदर शुक्रवारी या समितीचे सदस्य असलेले जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी बुधावले व एम. डी. सावंत तसेच पर्यटन महामंडळाचे अधिकारी श्री. कलपे यांनी या दोन्ही भागाची पाहणी केली. शनिवारी आमची चार सदस्यीय समिती पाहणी दौरा करणार आहे, असे स्पष्ट केले. नगराध्यक्ष संजू परब व नगरसेवक मनोज नाईक यांनी बुधावले यांची भेट घेतली.
Previous Articleजावळी तालुक्यातील अत्याचार प्रकरण 25 हजारात मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
Next Article सावंतवाडी लायन्स क्लबतर्फे अभियंत्यांचा गौरव









