प्रतिनिधी/रत्नागिरी
स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर साजरा होणाया युवक सप्ताहाची सुरुवात अभाविप देवरूख शाखेने देवरूख कुंभारवाडी येथे ’परिषद की पाठशाळा’ या उपक्रमाने सुरुवात केली. या कार्यक्रमाला कोकण प्रांत एस. एफ. एस (ए.इ.ए) संयोजक आणि दक्षिण जिल्हा सहसंयोजक तनयाताई पारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साक्षी वरक हिने भाषण केले आणि मुलांच्या मनातील विवेकानंदांची माहीत नसलेली प्रतिमा जागृत केली. पाठशालेची सुरुवात प्रार्थना घेऊन करण्यात आली. विविध खेळ घेण्यात आले. तनयाताई यांच्या मुळे विद्यार्थांना मनोरंजक शिक्षण पद्धतीचा आस्वाद घेता आला. या वेळी देवरूख शहर मंत्री आदित्य करंबेळे, सहशहर मंत्री दिप्ती साळवी आणि श्रावणी राजवाडे, कार्यालय मंत्री साक्षी वरक महाविद्यालय मंत्री दिव्य लोध, कार्यकारणी सदस्य ऐश्वर्या साळवी व नेहा साळवी, अनिकेत साळवी, प्रज्ञा साळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी भंडारा जिह्यातील झालेल्या दुर्दैवी अग्निअपघातात जीव गमावलेल्या चिमुकल्यांना श्रद्धांजली देण्यात आली आणि घोषणांच्या आवाजात कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.









