माशेल येथील बैठकीत नोनू नाईक यांचे आवाहन
वार्ताहर / माशेल
आम आदमी पक्ष हा गोव्यात परिवर्तन घडविण्यासाठी आलेला आहे. आपला लोकांचा वाढता पाठिंबा मिळू लागल्याने इतर पक्षातील नेते चलबिचल झाले आहेत, असे नोनू नाईक म्हणाले. माशेल येथील परिवर्तन यात्रेदरम्यान कोपरा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऍड. सुषमा गावडे या उपस्थित होत्या.
भाजपा सरकार गोमंतकीय जनतेला न्याय देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दहा हजार नोकऱया ही फसवी आश्वासने असून सरकार तुमच्या दारी हा निव्वळ फार्स आहे, अशी टिका नोनू नाईक यांनी केली. आप नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचा दिल्ली मॉडेल गोव्यात आणण्यासाठी गोव्यातील जनतेने सहकार्य आवश्यक आहे. आज गावागावात आम आदमी पक्षाच्या परिवर्तन सभा आयोजित केल्या जात आहेत. लोकांचा त्यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रियोळ मतदारसंघात अनेक समस्या असून त्या पूर्ण करण्यासाठी आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.









