रत्नागिरी/ प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील दाभोळ येथे 10 जानेवारी रोजी 20 वावात मासेमारी करणाऱया परप्रांतीय नौकेला अभिनिर्णय अधिकारी ऩा व़ि भादुले यांनी 3 लाख 77 हजार रुपयांचा दंड ठोठावला आह़े. थेरेसा डिसोझा (ऱा मंगलोर, कर्नाटक) यांच्या मालकीची जॉन लेरन्स (आयएनडी-केए-01-एमएम-3328) असे पकडण्यात आलेल्या नौकेचे नाव आह़े
10 जानेवारी ही नौका बोट जप्त करण्यात आली होत़ी या नौकेवरील 7 खलाशांवर मत्स्य आयुक्तांकडे खटला दाखल करण्यात आला होत़ा बोटीमध्ये असलेल्या 1300 किलो मासळीचा 35,550 रुपयांना लिलाव करण्यात आला होत़ा. दाभोळ परवाना अधिकारी दिप्ती साळवी यांनी ही कारवाई केली होत़ी कारवाईदरम्यान इतर सहकारी नौकाधारकांनी साळवी यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु याला न जुमानता मत्स्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होत़ी
8 जानेवारी रोजी दुपारी 1 च्या सुमारास 18 ते 20 परप्रांतीय नौका मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. या बाबतची माहिती मिळताच परवाना अधिकारी दिप्ती साळवी यांनी सागरी सुरक्षारक्षक योगेश तेस्कर यांच्यासह खलाशांच्या मदतीने शासकीय बोटीचा वापर करता जॉन लेरन्स (आयएनडी-केए-01-एमएम-3328) ही परप्रांतीय नौका ताब्यात घेतली. ही नौका दाभोळमध्ये जप्त करून ठेवण्यात आली होत़ी अभिनिर्णय अधिकारी ऩा व़ि भादुले यांनी 3 लाख 77 हजार रुपयांचा दंड ठोठावला आह़े. या कारवाईमुळे परंप्रातीय नौकांना चाप लागण्यास मदत होणार आह़े









