सावंतवाडी / उमेश सावंत:
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहात असलेला परप्रांतीय कामगार विश्वनाथ मणी नायर ६५ याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह खोलीच्या छपराला लुंगीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तो डिसिल्वा यांच्या घरात राहत होता. खोलीच्या दरवाजातून रक्त वाहून आल्याने शेजाऱ्याने घरमालकाला कळविले. मृत नायर यांच्या मुलाला याबाबत कळविण्यात आले. नंतर मुलगा सुरेश नायर याने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









