अनेक उद्योग बंद झाल्याने उत्तर प्रदेश येथील कामगार संकटात
प्रतिनिधी / बेळगाव
परराज्यात जाण्यासाठी कामगारांची धडपड सुरू आहे. पुन्हा एकदा उद्योगधंदे बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून गावी परतण्यासाठी त्यांची पायपीट सुरू झाली आहे. महाराष्ट्र हद्दीत असणाऱया आणि बेळगावपासून जवळच असणाऱया शिनोळी येथील कारखाने बंद पडल्याने तेथील कामगार आपल्या गावी रेल्वेने जाण्यासाठी बेळगावात चालतच दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांची पायपीट सुरू झाली आहे.
मागीलवषी सेवा सिंधू ऍपवर अनेक जण अर्ज करत होते. त्यामुळे यावषी तशी वेळ आली नसली तरी रेल्वे स्थानकावर परप्रांतियांची गर्दी होताना दिसत आहे. या परप्रांतीय कामगारांनी चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेण्याची गरज असून त्यांची योग्य सोय करण्याची गरज व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्मयातील ग्रामीण भागात संबंधित परप्रांतीयांना कामे व त्यांची कोविड तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नाही.
सध्या शिनोळी (ता. चंदगड) येथील कामगारांची बेळगावात दाखल होऊन रेल्वे पकडण्याची धडपड सुरू आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्याचाच फटका या कामगारांना बसला आहे. उत्तर प्रदेश येथील कामगारांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तेथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील कामे बंद झाल्याने शिनोळी येथील कामगार आता माघारी परतत
आहेत.
लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद
देशातील विविध राज्यांतून कामानिमित्त बेळगाव जिल्हय़ात अनेक कामगार आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे परप्रांतीय कामगार आपल्या राज्याकडे परतण्यासाठी धडपड करू लागले आहेत. काही कामगारांना अधिक माहिती नसल्यामुळे समस्या निर्माण होऊ लागली आहे. या कामगारांची तळमळ पाहून साऱयांनाच दुःख होत आहे. कामे बंद झाल्याने आता त्यांची धडपड घरी जाण्याकडे लागून राहिली आहे.









