मुंबई
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये 14 हजार 935 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 1 ते 11 फेब्रुवारीदरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात समभागांच्या माध्यमातून 10 हजार 80 कोटी रुपये आणि रोखे बाजारातून 4 हजार 830 कोटी रुपये काढले आहेत. अमेरिकेतील फेडरल बँक व्याजदर वाढवण्याची शक्मयता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी पैशांची उचल केल्याचे सांगितले जात आहे.









