प्रतिनिधी / करमाळा
दिनांक १४ रोजी झालेल्या परतीच्या मुसळधार पाऊसाने जेऊर येथील ओढ्याला पुर आला व लव्हेरोड येथील ओढ्यातून एक स्वीफ्ट वाहुन जाताना नागरिकांनी पाहिली त्याची माहिती मिळताच जेऊर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल जाधव, हावलदार मारुती रणदिवे, पोलिस नाईक गणेश शिंदे, पोलिस कॉस्टेबल सिध्देश्वर लोंढे, साहेबराव ठाकरे, समिर खैरे, यांना पाण्यात गाडीचा शोध घेत होते. आज सकाळी गाडी मिळुन आली असुन त्या मध्ये तीन व्यक्तिंचा जागीच बुडुन मृत्यू झालेला आहे.
मयतांची नावे पुढील प्रमाणे –
राहुल नवनाथ टोनपे वय २७वर्ष मूळ गाव झरे ता.करमाळा सध्या राहणार काळेवाडी पिंपरी चिंचवड, पुणे,
गजानन सदाशिव वायकर वय ७२ वर्ष मुळगाव वडशिवणे ता.करमाळा सध्या पिंपरी चिंचवड, पुणे
सचिन गजानन वयकर वय ३८ वर्षे मुळगाव वडशिवणे सध्या पिंपरी चिंचवड, पुणे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









