साहित्य : 200 ग्रॅम पनीर, 1 जुडी मेथी, 2 चमचे तेल, 1 चमचा जिरं, 1 लाल सुकी मिरची, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 कांदे बारीक चिरून, अर्धा चमचा कसूरीमेथी, पाव वाटी दूध, अर्धा चमचा हळद पावडर, पाव चमचा लाल तिखट पावडर, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, चवीपुरते मीठ
कृती : मेथी निवडून धुवून कोरडी करावी. नंतर बारीक चिरून घ्यावी. पनीर कुस्करून अथवा खिसून घ्यावे. गरम तेलात जिरं टाकावे. नंतर हिंग, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची टाकावी. आता त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवून घ्यावा. नंतर त्यात मेथी, हळद पावडर, मीठ आणि लाल तिखट पावडर टाकून मिश्रण मिक्स करावे. त्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे मिश्रण वाफवून घ्यावे. नंतर झाकण काढून मिश्रण परतवावे. म्हणजे त्यातील वाफ निघून जाईल. आता त्यात दूध आणि कसूरीमेथी टाकून मिश्रण परतवावे. नंतर त्यात कुस्करलेले पनीर मिक्स करून तीन ते चार मिनिटे मिश्रण परतवून घ्यावे. म्हणजे मिश्रणाला तेल सुटल्यासारखे होईल. आता आच बंद करावी. तयार पनीर मेथी भुर्जी पुरी अथवा चपातीसोबत खाण्यास द्या.