ऑनलाईन टीम/तरुण भारत
महिला पत्रकार राणा अय्यूब लंडनसाठी निघालेल्या असताना त्यांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं. त्यांना भारत सोडण्यापासून मनाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्यूब आरोपी असून ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. याचमुळे त्यांना लंडनला निघालेल्या विमानातून प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं. राणा अय्यूब यांनी कोरोना काळात मदतीसाठी देणगी गोळा करताना विदेशी निधी नियमांचे कथित उल्लंघन केल्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. विमानतळावर रोखण्यात आल्यानंतर राणा अय्यूब यांनी ट्विट करत आश्चर्य व्यक्त केलं.
राणा अय्युब ट्वीट करत म्हणाल्या “भारतीय लोकशाहीवर भाषण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पत्रकारिता महोत्सवात जाण्यापासून मला रोखण्यात आलं. काही दिवसांपूर्वी मी हे सार्वजनिकपणे जाहीर केलं होतं. मला थांबवल्यानंतर ईडीचे समन्स माझ्या इनबॉक्समध्ये आल्याचं कुतुहूल आहे.”