वायोलिन वाजवून जमविली रक्कम
इंटरनेटच्या जगात दररा अशा कहाण्या समोर येतात, ज्या मनाला भिडतात. अखेर हे काय घडतंय असा विचार करण्यास भाग पाडतात. अनेकदा अशा लोकांना मदत करण्याची इच्छाही जागृत होते आणि लोक करतात देखील. आता कोलकात्यातील एका वृद्ध जोडप्याची कहाणी समोर आली आहे. येथील स्वप्न सेठ स्वतःच्या पत्नीसाठी जे काही करत आहेत, ते सर्वांना भावुक करणारे आहे.
संगीताचाच आसरा
स्वप्न सेठ यांच्या पत्नीला कर्करोग झाला होता. तिच्यावर उपचार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ज्याकरता त्यांना पैशांची गरज होती. उपचारासाठी रक्कम उभारण्याकरता ते संगीत आणि कलेचा आसरा घेत होते. ते ठिकठिकाणी जायचे आणि तेथे वायोलिन वाजवून त्याद्वारेच स्वतःच्या पत्नीच्या उपचाराकरता पैसे जमा करायचे.
2002 साली कर्करोग
त्यांच्या पत्नीला 2002 साली कर्करोग झाला होता. कोलकात्याच्या बलराम डे स्ट्रीट येथील रहिवासी असलेल्या स्वप्न सेठ यांची पत्नी आता बरी झाली आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. पत्नी बरी झाली तरीही ते वायोलिन वाजवतात. खरे तर ते एक चित्रकार आहेत, सोशल मीडियावर त्यांच्या चित्रफित प्रसारित होत असतात. दुःखातही त्यांनी संगीताद्वारे लोकांचे मनोरंजन करणे थांबविले नव्हते.