गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
लग्नाच्या गाठी देवच बांधत असतो असे म्हटले जाते. अशीच एक कहाणी आहे. ब्रिटनच्या जेम्स आणि क्लोईची. या दोघांची जोडी अत्यंत अनोखी आहे. पती आणि पत्नीच्या उंचीत मोठे अंतर असूनही या दोघांची मने जुळलेली आहेत. देघेही परस्परांवर प्रचंड प्रेम करतात. तर स्वतःच्या उंचीतील सर्वाधिक अंतर असलेल्या पती-पत्नीचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.
विवाहितांच्या शेणीत या दांपत्याच्या उंचीतील अंतर जगात सर्वाधिक आहे. त्यांच्यात सुमारे 2 फुटांचे अंतर आहे. पत्नी क्लोची उंची 5 फूट 5 इंच आहे. तर जेम्सची उंची तिच्याहून सुमारे दोन फूट कमी म्हणजेच 3 फूट 7 इंच आहे.
33 वर्षीय जेम्स एक अभिनेता तर त्याची 27 वर्षीय पत्नी क्लोई शिक्षिका आहे. दोघांची पहिली भेट 2012 मध्ये एका स्थानिक पबमध्ये झाली होती. एका सामायिक मित्राने त्यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर दोघांची ओळख वाढत गेली आणि भेटण्याचे सत्र सुरू झाले.
पण प्रारंभी दोघेही परस्परांशी नाते निर्माण करण्यावरून गोंधळात होते. पण डिसेंबर 2013 मध्ये दोघांनी प्रेमाची कबुली दिली आहे. त्यानंतर 7 महिन्यांनी उत्तर वेल्सच्या एका सरोवरातील टूरदरम्यान जेम्सने विवाहासाठी मागणी घातली असता क्लोईने होकार दर्शविला.
2016 मध्ये दोघांनी विवाह केला, त्यांना आता ओलिविया नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. निश्चितपणे जेम्सला भेटल्यावर माझे जग बदलल्याचे उद्गार क्लोईने काढले आहेत. आमची प्रेमकहाणी इतरांना चांगला संदेश देणार असल्याची अपेक्षा आहे. प्रत्येकाची स्वतःची अशी एक कहाणी असते असेही तिने म्हटले आहे. लहानाचा मोठा होत असताना मी कधी विवाह करू शकणार का असा संशय मनात होता. पण आमचे नाते प्रत्येकासाठी कुणी ना कुणी असते हे सिद्ध करत असल्याचे जेम्सने म्हटले आहे.









