प्रतिनिधी/ पणजी
तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीसह अनेक ठिकाणी झाडे पडून, इंटरनेट सेवा बंद राहून, दूरध्वनी सेवा बंद राहिल्यामुळे नुकसान झाले. किनारीभागात असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले. परंतु मांडवी तीरापासून ते मिरामार समुद्रकिनाऱयापर्यंतचा भाग तटबंदी असल्याने नुकसानीपासून वाचला. तौक्ते चक्रीवादळात किनारीभाग वाचला असला तरी पावसाळय़ात किनारीभाग खचण्याची शक्यता असल्याची भीती पणजीवासियांना व्यक्त करत आहेत. किनारीभाग खचू नये आणि पाण्याचा विसर्ग होण्यासाठी जलस्त्राsत खात्याने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी पणजीवासियांनी केली आहे. जर किनारभागी खचण्याविरोधात उपाययोजना केल्यातर अनेक लोकांचे जीव वाचू शकतील.
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पणजीत मागील 24 तासात सुमारे 150 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रूआ द ओरेम मळा व आसपासच्या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. इको नाजूक झोन म्हणून ओळखल्या जाणाऱया कांपाल स्ट्रेचिंग येथे माती खचली आहे. 1978-79 सालात कांपाल येथील युथ हॉस्टेलनजीक समुद्रकिनाऱयावर बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला असून या भागात संरक्षित दुसऱया तटबंदीने सुरक्षित केले आहे. 1991-92 साली कांपाल येथील स्वीमींग पूलच्या मागील बाजूस, 1992-93 या दरम्यान कला अकादमीमागील लाईट हाऊस आणि फॉरेस्ट नर्सरी, इंडोर स्टेडियम, 1995-96 व 1997-98 या दरम्यान कला अकादमी, चिल्ड्रर्न्स पार्क पणजी, 2007- 08 या दरम्यान भगवान महावीर चिल्ड्रर्न्स पार्कमागे माती खच्चीकरणावर उपाययोजना घेण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या समुद्री लाटांमुळे समुद्री संरक्षण भिंत डळमळीत झाली असून कधीही खाली कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलस्त्राsत खात्याने याकडे लक्ष देऊन संरक्षित भिंत बांधून पणजीत होणाऱया पूराला आळा घालावा अशी मागणी केली जात आहे.








