समितीतर्फे 7 ते 12 मार्चपर्यंत आयोजन, कलाकारांचाही होणार सन्मान
प्रतिनिधी/ पणजी
पणजी शिमगोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 7 ते 12 मार्च या दरम्यान शिमगोत्सवातील कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असून, यंदाच्या शिमगोत्सवात मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय तीन कलाकारांचाही सन्मान करण्याबरोबरच चित्ररथ, रोमटामेळ व लोकनृत्य यांच्यासाठी फिरता चषक देण्यात येणार आहे, अशी माहिती शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी दिली.
मिरामार येथे काल (शनिवारी) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला शिमगोत्सव समितीचे सचिव शांताराम नाईक, कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, खजिनदार संदीप नाईक व महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.
श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले की, पणजीच्या शिमगोत्सवाला 36 वर्षांची परंपरा आहे. यंदाचे वर्ष हे 36 वे आहे. त्यामुळे यंदा भरीव बक्षिसे ठेवण्याबरोबरच कलाकारांचाही सन्मान करण्याचा निर्णय शिमगोत्सव समितीने केलेला आहे. पणजीत शिमगोत्सव साजरा होण्यामागे आजी-माजी आमदारांचे योगदान व धेंपो ग्रुप तसेच पालिका मंडळाचे सहकार्य मोलाचे असल्याचेही ते म्हणाले. यंदा 7 मार्च रोजी शिमगोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. 7 मार्च रोजी गुलालोत्सव साजरा करण्यात येणार आहे. चित्ररथ, रोमटामेळ यासाठी धेंपो ग्रुपतर्फे 70 हजार ऊपये बक्षिसांसाठी देण्यात आलेले आहेत. उर्वरित रक्कम गोवा पर्यटन खात्यातर्फे बक्षिसाच्या स्वऊपात देण्यात येणार आहे. एकूण बक्षिसांची रक्कम 6 लाख 70 हजार ऊपये असल्याचेही धेंपो यांनी सांगितले.
शिमगोत्सवातील बक्षिसे पुढीलप्रमाणे:
चित्ररथ स्पर्धा : 75 हजार ऊपये (प्रथम) 60 हजार ऊपये (द्वितीय), 40 हजार ऊपये (तृतीय). उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये 30 हजार ऊपये (प्रथम), 20 हजार ऊपये (द्वितीय), 15 हजार ऊपये (तृतीय), 12 हजार ऊपये (चतुर्थ), 10 हजार ऊपये (पाचवे). तसेच 6 हजार ऊपयांची 16 बक्षिसे असून, 5 हजार ऊपयांची 3 बक्षिसे दिले जाणार आहेत.
रोमटामेळ स्पर्धा : 50 हजार ऊपये (प्रथम), 35 हजार ऊपये (द्वितीय), 25 हजार ऊपये (तृतीय), 10 हजार ऊपये (चतुर्थ), 8 हजार ऊपये (पाचवे). तर 7 हजार ऊपयांची 5 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
लोककला नृत्य स्पर्धा : 20 हजार ऊपये (प्रथम), 15 हजार ऊपये (द्वितीय), 10 हजार ऊपये (तृतीय) तर 5 हजार ऊपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे, 3 हजार ऊपयांची 5 उत्तेजनार्थ बक्षिसे, 2 हजार ऊपयांची 8 बक्षिसे देण्यात येणार आहेत.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये वेशभूषा स्पर्धेतील वरिष्ठ गटासाठी 7 हजार ऊपये (प्रथम), 5 हजार ऊपये (द्वितीय), 3 हजार ऊपये (तृतीय). कनिष्ठ गटासाठी 2 हजार 500 ऊपये (प्रथम), 1 हजार 500 ऊपये (द्वितीय), 1 हजार ऊपये (तृतीय) तर 500 ऊपयांची 10 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
फिरता चषकही देणार
चित्ररथ स्पर्धकांसाठी स्व. श्रीमती पुतू नाईक यांच्या स्मरणार्थ फिरता चषक देण्यात येणार असून, मंगलदास नाईक यांनी हे बक्षीस पुरस्कृत केले आहे. रोमटामेळ स्पर्धकांसाठी स्व. कृष्णा व्ही. नार्वेकर यांच्या स्मरणार्थ फिरता चषक देण्यात येणार असून, किशोर नार्वेकर यांनी हे बक्षीस पुरस्कृत केले आहे. तर लोकनृत्य स्पर्धकांसाठी स्व. सुशिलाबाई अनंत नाईक यांच्या स्मरणार्थ फिरता चषक देण्यात येणार असून, सुनील नाईक यांनी हे बक्षिस पुरस्कृत केले आहे.
कलाकारांचा होणार सन्मान
पारंपरिक मूर्तीकला जोपासून तिचे जतन करण्यासाठी अतुलनीय योगदान दिल्याबद्दल झिलू दत्ताराम हरमलकर यांचा शिमगोत्सवात सन्मान करण्यात येणार आहे. नाट्याक्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल विद्याधर शिरोडकर यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्रियात्रच्या माध्यमातून समाजात जागृती करण्याचे काम तित्रात्र कलाकार सिझर डिमेलो यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याने शिमगोत्सव समितीतर्फे या तिन्ही कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.









