ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला राज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले, “राज्य दिनानिमित्त मेघालयमधील माझ्या बंधू-भगिनींना शुभेच्छा . दयाळूपणा आणि बंधुत्वाच्या भावनेसाठी हे राज्य ओळखले जाते. मेघालयातील तरुण सर्जनशील आणि उद्यमी आहेत. आगामी काळातही राज्य नवीन शिखरे गाठत राहो.”









