ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारासंदर्भात ही बैठक होणार होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पियुष गोयल, नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात येते.केंद्रीय मंत्रिमंडळात 79 सदस्य असू शकतात. सध्या 53 मंत्री आहे. महाराष्ट्रातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर, हिना गावित, नारायण राणे यापैकी एक ते दोन नेते मोदी मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.