ऑनलाईन / टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी शुक्रवारी रोममध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल (Charls Michele)आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन(Ursula von der Leyen) यांची भेट घेतली आणि व्यापार आणि गुंतवणूक संबंध, हवामान बदल, कोविड-19 (Covid-19) या विषयांवर विस्तृत चर्चा केली.
G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी कोविड-19 पासून जागतिक आर्थिक आणि आरोग्य पुनर्प्राप्ती, शाश्वत विकास आणि हवामान बदल यावरील चर्चेत इतर नेत्यांमध्ये सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच्या एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचे इटली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि इटलीतील भारताचे राजदूत यांनी स्वागत केले.
“माझ्या इटलीच्या भेटीदरम्यान, मी व्हॅटिकन सिटीलाही भेट देईन, परमपूज्य पोप फ्रान्सिस यांची भेट घेईन आणि राज्य सचिव,कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन यांची भेट घेईन” असे पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सांगितले होते