वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत रौप्यपदक मिळविणारा भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सिंगापूरच्या लोह येयुने किदांबी श्रीकांतचा सरळ गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. श्रीकांतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीचे पंतप्रधान मोदी यांनी खास कौतुक करत श्रीकांतला शुभेच्छा दिल्या. विश्व बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत 1983 साली भारताच्या प्रकाश पदुकोनने कास्यपदक, 2019 साली बी. साईप्रणितने कास्यपदक तसेच 2021 साली भारताच्या लक्ष्य सेनने कास्यपदक मिळविले आहे. महिला विभागात भारताच्या पी.व्ही. सिंधु आणि सायना नेहवाल यांनी यापूर्वी या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते.









