ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचे भूमिपूजन येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची यासंदर्भात शनिवारी बैठक झाली. या बैठकीत 3 किंवा 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज भूमीपुजनाची 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन होणार असले तरीही मोदी प्रत्यक्षात अयोध्येत जातील, की सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिपूजन करतील, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.
या बैठकीत राममंदिराच्या मूळ आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. मंदिराची उंची 128 फुटांवरून 161 फुटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन मजल्यांचे हे मंदिर असेल. मंदिरासाठी 2.77 एकर जमीन लागणार आहे. मंदिरावर पाच घुमट असणार आहेत.









