नवी दिल्ली / प्रतिनिधी
भाजपने कॉंग्रेसवर “घाणेरड्या राजकारण” खेळल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव धोक्यात आणल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे प्रत्युत्तर काँग्रेसने आज बुधवारी दिले. काँग्रेसने असा दावा केला की पंतप्रधानांच्या रॅलीसाठी सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर विशेष संरक्षण गट आणि इतर एजन्सींच्या सहकार्याने योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले “फिरोजपूरमधील रॅली रद्द करणे हे कोणत्याही सुरक्षेचा भंग नसून कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्यांमुळे आणि पंजाबी लोकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने झाली आहे.”
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॉंग्रेसवर आगामी राज्य निवडणुकांमध्ये “मोठा पराभव” होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार “डर्टी ट्रिक्स” खेळत असल्याचा आरोप केला. तसेच गृह मंत्रालयाने (एमएचए) सुरक्षेच्या उल्लंघनासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या प्रतिक्रिया आल्या.