प्रतिनिधी/ बेंगळूर
गेल्या रविवारीच राज्यात येऊन म्हैसूर आणि बेंगळूरमध्ये जोरदार प्रचार केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिल रोजी पुन्हा निवडणूक प्रचारासाठी राज्यात येत आहेत. दरम्यान, त्यांनी चिक्कबळ्ळापूर आणि बेंगळूर येथील जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. राज्यात निवडणुकीला रंग चढला असून पंतप्रधान मोदीही राज्यात भाजप समर्थक प्रचारात सक्रिय झाले आहेत. 20 रोजी चिक्कबळ्ळापूर येथे दुपारी 4 वाजता जाहीर सभेत भाजपचे उमेदवार डॉ. के. सुधाकर यांच्यातर्फे प्रचार करणार आहेत. चिक्कबळ्ळापुरातील सभेनंतर बेंगळूर येथील पॅलेस मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत सहभागी होणार असून भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.









