ऑनलाईन टीम / चंदीगड
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच बुधवारी पंजाब मधील जालंधर मध्ये एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आता पर्यंत कोरोनामूळे 39 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सापडलेल्या 12 नव्या रुग्णांमूळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 2014 झाली आहे. तर काल बुधवारी एका दिवसात 152 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत एकूण 1794 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
नव्या रुग्णांमध्ये अमृतसरमधील 4 जालंधर मधील 4, लुधियानामधील 2, कपूरथला आणि पटियाला मधील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. तसेच डिस्चार्ज दिलेल्या 152 रुग्णांपैकी जालंधर 4, लुधियाना चे 88, गुरुदासपूर 2, नवांशहर 30, पटियाला 15, फतेहगढ साहिब 8, मानसा 3 आणि पठाणकोट मधील 2 रुग्णांचा समावेश आहे.









