प्रतिनिधी/ सातारा
कराड पंचायत समितीच्या कक्ष अधिकारी यांच्यासह इतर कर्मचायांना कोरोनाची बाधा होताच सातारा जिल्हा परिषदेत कडक नियमावली केली आहे.मात्र, सातारा पंचायत समितीत कोणी ही या आपलंच हाय अशी अवस्था झाली आहे.आरोग्य विभागाचे असलेले कार्यलय तूर्तास पंचायत समितीच्या सभागृहात करावे जेणेकरून सर्व्हे करून आलेल्या कर्मचायांना सोशल डिस्टनन्स ठेवून काम करता येईल, अशी मागणी होत आहे.परंतु पंचायत समितीच्या पदाधिकायांकडे निर्णय क्षमता घेण्याचे धाडस नाही.
कोरोनाच्या संकटात सातारा पंचायत समितीमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही.नुसते सानिटायझर मशीन बसवून उपयोग नाही.सातारा पंचायत समितीच्या आवारात कोणी ही येते आणि कोणीही जाते.दाटीवाटीने वेगवेगळे विभाग एकाच खोलीत काम करतात.तर आरोग्य विभाग एका खोलीत काम करतो.सोशल डिस्टनन्स पाळला जात नाही.सध्या तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.तेथे प्रत्यक्ष सर्व्हेला असणारे कर्मचारी सर्व्हे करून माहिती देण्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागात त्या कक्षात येतात तेव्हा अगोदर अरुंद खोली, त्यात सोशल अंतर कसे पाळले जाणार?,यासाठी आरोग्य विभागाचे कार्यलय तात्पुरते पंचायत सभागृहात हलवण्यात यावे अशी मागणी होत आहे.परंतु पदाधिकारी यांच्याकडे निर्णय क्षमता नसल्याने कराड पंचायत समितीची जशी अवस्था झाली तशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








