प्रतिनिधी / कोल्हापूर :
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरण क्षेत्रासह जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्वच नद्यांनी इशारा पातळील ओलांडली आहे. पंचगंगा नदीने दुपारी दीड वाजताच 39 फूट ही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिला आहे.
गेल्या 24 तासांत तब्बल दहा फूट पाणी पातळी वाढली आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यांतील 40 बंधारे पाण्याखाली गेले होते. तर पंचगंगेची पाणीपातळी 33 फुटांवर होती. रात्री धुव्वांधार पासामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दुपारी 12 वाजता 37 फूट पाणी पातळी होती. मात्र संततधार सुरुच असल्याने वेगाने पाणीपातळी वाढत आहे. दुपारी दीड वाजात पंचगंगा नदीने 39 फुटांची पातळी गाठत इशारा दिला आहे. 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रात्री आठपर्यंत धोका पातळीही ओलांडेल असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे. संभाव्य पूर पस्थितीची गंभीरता ओळखून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे पाणी शिरणाऱया भागातील नागरिकांसह, जनावरांचे स्थलांतर सुरु केले आहे. दुपारर्पंत 20 मार्गही बंद झाले आहेत. शहरातील रेणुका ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे.