रात्रीतून पाणी पातळीत पाच फुटांनी वाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्याच्या सर्वच भागात बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने नद्यांच्या पाणीपातळी वेगाने वाढ होत आहे. एका रात्रीत पंचगंगेच्या पाणीपातळीत पाच फुटांनी वाढ झाली असून राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 31 फुटांवर पोहचली आहे. पंचगंगाची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. सायंकाळपर्यंत 33 बंधरे पाण्याखाली गेले होते. डोंगरमाथ्यावरही जोर सुरुच असल्याने राधानगरी धरणात 60 टक्के पाणीसाठा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 7 पासून धरणाच्या सिंचन विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. घटप्रभा, जांबरे, कोदे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
`हे’ ३३ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील
शिंगणापूर
राजाराम
सुर्वे
रुई
इचलकरंजी
तेरवाड व शिरोळ
भोगावती नदीवरील
हळदी, राशिवडे
सरकारी कोगे व खडग कोगे
तुळशी नदीवरील-बीड
वारणा नदीवरील
चिंचोली व माणगाव
कुंभी नदीवरील
कळे
मांडूकली
सांगशी व शेणवडे
कासारी नदीवरील
यवलूज
वेदगंगा नदीवरील
वाघापूर व निळपण
दुधगंगा नदीवरील
दत्तावाड
राजाराम 31.10 फूट
सुर्वे 27.8, रुई 57
इचलकरंजी 53
तेरवाड 47.8
शिरोळ 36
नृसिंहवाडी 32.1
राजापूर 23 फूट अशी आहे तर धरणाक्षेत्रात दमदार पाऊस सुरु असल्याने धरणांमध्ये पाणीसाठ्याचा वेग वाढला आहे
धरणातील पाणीसाठा दलघमी तर कंसात टक्केवारी :
तुळशी | 58.68, (60) |
वारणा | 739.07, (76) |
दूधगंगा | 375.21, (52) |
कासारी | 55.82, (71) |
कडवी | 42.12, (59) |
कुंभी | 58.08, (76) |
पाटगाव | 73.89, (70) |
चिकोत्रा | 26.20, (73) |
चित्री | 38.72, (73) |
जंगमहट्टी | 17.01 (49) |
घटप्रभा | 44.17 (100) |
जांबरे | 23.23 (100) |
दलघमी तर आंबेआहोळ | 19.70 (52) |
गगनबावडा येथे 103.8 मिमी पाऊस
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 103.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सकाळी 11 वाजता संपलेल्या 24 तासात हातकणंगले- 13.6 मिमी, शिरोळ- 6.3 मिमी, तर पन्हाळा- 39.8, शाहूवाडी- 64.7, राधानगरी -77.9, गगनबावडा- 103.8, करवीर- 34.9, कागल- 36.4, गडहिंग्लज- 30.4, भुदरगड- 48.1, आजरा-35.5, चंदगड- 29.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.