प्रतिनिधी / शिरोळ
पंचगंगा नदीतील प्रदूषण करणाऱ्या घटकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना दिले. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही नोटिसा लागू करा चार दिवसाच्या आत पंचगंगा नदी प्रवाहित करणे इचलकरंजी नगरपालिकेने तातडीने मृत्त माशांची विल्हेवाट लावणे व प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणे यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय प्रांताधिकारी विकास खरात यांनी जाहीर केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीन तास नदीच्या पात्रात उभे राहून जल आंदोलन केले. तहसिलदार कार्यालयात घेण्यात येणारी बैठक प्रथमच पंचगंगा नदीच्या घाटावरच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणतेही उद्योग धंदे बंद करू नये की आमची प्रामाणिक भावना असून प्रदूषित पाणी दूषित करण्या शुद्ध करण्यासाठी संबंधित कारखान्याला प्लांट टाकण्यास सांगावे यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.