ऑनलाईन टीम / मुंबई :
नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात एका कंटेनरमधून 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 125 कोटी रुपये आहे. डीआरआय मुंबईने बुधवारी ही कारवाई केली असून, याप्रकरणी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने आज यासंदर्भात ट्विट केले आहे.