ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर 15 ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पहिल्यांदाच तिरंगा फडकणार आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथील फेडरेसन ऑफ इंडियन असोसिएशनने यासंदर्भातील घोषणा केली आहे.
भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जयस्वाल न्यूयॉर्कमधील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून इतिहास रचण्यात येणार आहे.
अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनादरम्यान याच गटाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या टाइम्स स्क्वेअरच्या होर्डिंगवर राम मंदिर दाखवले होते. टाइम्स स्क्वेअरमध्ये बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचे थ्री डी फोटो झळकले होते. बिलबोर्डची ही स्क्रीन 17,000 चौरस फूट होती. हा बिलबोर्ड जगातील सर्व मोठा आणि आकर्षक आहे.