वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडमध्ये होणाऱया ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेतील सामने तसेच न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील होणाऱया सामन्यांच्या ठिकाणात बदल करण्याचा निर्णय क्रिकेट न्यूझीलंडने घेतला आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पुरूष संघातील टी-20 सामने तसेच न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला संघातील सामने यापूर्वी टॉरेंगा येथे खेळविले जाणार होते. पण काही तांत्रिक अडचणीमुळे हे सर्व सामने आता वेलिंग्टनमध्ये खेळविले जातील, अशी घोषणा क्रिकेट न्यूझीलंडने केली आहे. टी-20 मालिकेतील पुरूष विभागाचा शेवटचा सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया तसेच महिला विभागातील न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामना बंदीस्त स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे.









