प्रतिनिधी / बेळगाव
माळमारूती पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी वकिलांना उद्धट उत्तरे दिली. वारंवार अशाप्रकारे वकिलांचा अवमान होत आहे. त्यामुळे वकिलांनी न्यायालयासमोरील रस्त्यावर रास्तारोको केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
या रास्तारोकोमुळे वाहतूकीची कोंडी झाली. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.