सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्हा न्यायालयात लिपिक व स्टेनो पदावर नोकरी लावतो असे सांगून फसवणूक केल्या प्रकरणी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व अन्य एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाई पोलिसांनी आखाडे यास अटक केली असून त्याची न्यायालयाने पोलीस कोठडी नंतर आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
निवृत्त न्यायाधीश माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून व संगणमत करून महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व निलेश रामदास थोरात (कोथरूड पुणे)या दोघांनी फिर्यादीच्या पत्नीला नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. यासाठी अडीच लाख रुपये घेतल्याची फिर्याद कुमार पोपट धोत्रे (रा.गुरे बझार झोपडपट्टी, सिद्धनाथ वाडी, वाई) यांनी जानेवारी २०२०मध्ये वाई पोलीस ठाण्यात दिली.
अशाच प्रकारे इतर तिघांची मिळून साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नोकरी मिळत नाही म्हणून पैसे मागण्यास गेले असता संबंधितांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धोत्रे यांनी फिर्याद दिल्यानंतर आखाडे व थोरात यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वाई पोलिसांनी आखाडे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली नंतर आज न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान निलेश थोरात फरारी आहेत. याबाबत अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राजेंद्र कदम करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









