ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये आज सकाळी पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला.
हवालदार सांबर गुरुंग असे शहीद जवानाचे नाव आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. आज सकाळीही पाक सैन्याने नौशेरा सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला. याला भारतीय जवनांनीही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या हल्ल्यात सांबर गुरुंग गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.