नवी दिल्ली :
2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा नौकानयनपटू दत्तू भोकनाळ याच्यावर राष्ट्रीय नौकानयन फेडरेशनने दोन वर्षांची बंदी घातली होती पण भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या मध्यस्थीमुळे दत्तूवरील ही बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याचे आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत दत्तू भोकनाळने पुरूषांच्या क्वॅड्रूपल स्कल्स या प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. या शर्यतीवेळी दत्तूची प्रकृती तंदुरूस्त नसल्याने तो आपली बोट वळविताना पाण्यात पडला. नियमावलीचा भंग झाल्याने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी 23 जानेवारी 2020 रोजी उठविल्याचे राष्ट्रीय नौकानयन फेडरेशनने सांगितले आहे.









