नवी दिल्ली
गेल्या नोव्हेंबरमध्ये सोने आयात मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 41 टक्के इतकी घटली आहे. पण मागच्या ऑक्टोबर महिन्यातील आयातीशी तुलना करता आयातीत 14 टक्के वाढ झाली आहे. उत्सवी हंगामानंतर गेल्या महिन्यात वर्षाच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 41 टक्के आयात घटून 33.1 टनावर राहिली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये 29 टन सोने आयात करण्यात आले होते. जानेवारी ते नोव्हेंबरच्या कालावधीत सोने आयातीत 63 टक्के इतकी घट होण्याचा अंदाज आहे.









