ऑनलाईन टीम / नोएडा :
कोरोना काळात नोएडामध्ये घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या मास्कने नाक आणि तोंड झाकलेले नसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे तसेच संबंधित व्यक्तीस दंड देखील भरवा लागणार आहे. हाय कोर्टाकडून नियमावली जाहीर केल्यानंतर नोएडा पोलिसांनी हा आदेश जारी केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना नोएडा झोनचे एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र हा मास्क लावताना नाकाच्या वर पर्यंत लावलेला असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने नाकाच्या खाली मास्क लावल्यास संबंधित व्यक्तीस 100 रुपये दंड भरवा लागेल.
या संदर्भात सर्व पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरताना नियमानुसार मास्क न लावणाऱ्यांविरोधात अभियान सुरु करुन कारवाई केली जाणार आहे.









