जिल्हय़ात पीक विमा योजनेला वाढता प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र शासनाकडून शेतकऱयांच्या हितासाठी पीक विमा योजना राबविण्यात आली आहे. दरम्यान, मागील चार वर्षांत अतिवृष्टीचा फटका शेतकऱयांना बसला आहे. त्यामुळे यंदा पीक विमा भरणाऱया शेतकऱयांची संख्या साहजिकच वाढली आहे. नैसर्गिक संकट काळात ही विमा योजना शेतकऱयांना संरक्षण देणार आहे.
जिल्हय़ात यंदा 7.53 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी 90 टक्के पेरणी पूर्ण झाली होती. अस्मानी संकटांचा सामना करता यावा, यासाठी केंद्र सरकारने पीक विमा योजना सुरू केली आहे. खरीप हंगामातील भात, भुईमूग, बटाटा, सोयाबीन आदी पिकांवर शेतकऱयांनी विमा उतरविला आहे. मागील दोन वर्षात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. विशेषतः नदीकिनारी असलेल्या शेतकऱयांचे पीक वाया गेले. अशा नैसर्गिक आपत्तीवेळी ही विमा योजना शेतकऱयांना आधार ठरणार आहे.
पीक विमा भरणाऱया शेतकऱयांच्या संख्येत वाढ
नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती, कीड आणि इतर संकट काळात या विम्यातून शेतकऱयांना भरपाई दिली जाणार आहे. पीक विम्याबाबत कृषी खात्यामार्फत जागृती करण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीक विमा भरणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. अतिपाऊस, कीड, वादळ आणि स्थानिक आपत्तींमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. काही वेळा काढणीला आलेली पिके जमीनदोस्त होतात. अशा वेळी ही विमा योजना शेतकऱयांना पाठबळ देणारी आहे.
राज्यात 42.61 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांची नेंद झाली आहे. पीक नोंदणीमध्ये बिदर जिल्हा आघाडीवर आहे. काही शेतकरी पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. काहींचे शेती क्षेत्र कमी असल्याने पीक विमा योजना करणे अडचणीचे बनत आहे. पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळविण्यासाठी पीक विमा योजना शेतकऱयांना आधार ठरणार आहे.
शिवनगौडा पाटील (कृषी उपनिर्देशक, बेळगाव)
बेळगाव जिल्हय़ात पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पीक विमा योजनेसाठी जागृती अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱयांनी पीक विमा योजनेत नोंद केली आहे.









