वार्ताहर / नेसरी
नेसरी येथे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करून दुचाकी व चारचाकी वाहने विनाकारण फिरवल्याने नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल करून वाहने जप्त करण्यात आली आहे. तर काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी नामदेव दळवी रा. नेसरी यांची मारुती सुझुकी ओमनी ( एम एच ०९ बी बी ६४५२) , समीर मनगुतकर रा. तावरेवाडी यांची ह्युंडाई सॅन्ट्रो ( एम एच ०४ बी वाय १५४४), किरण नलवडे रा. नेसरी यांची टोयाटो इनोव्हा ( एम एच ०५ सी एच २७१), मनोहर पाटील रा. अर्जुनवाडी यांची टिव्हिएस स्कुटर ( एम एच १४ जी जी ०५४६), विक्रम मुंगारे रा. डोणेवाडी यांची ( एम एच ०६ ए ई ८८८५ ), किसन देसाई रा. कोवाडे यांची ह्युंदाई एस्येन्ट ( एम एच १४ बी जी २६९४ ), महेश मटकर रा. शिप्पूर तर्फ नेसरी यांची ( होंडा शाईन एम एच १४ जी डब्लू ६२३६ ), दीपक पाटील रा. अर्जुनवाडी यांची बजाज पल्सर ( एम एच ०९ डी एल ७७४६) या सर्वांनी जिल्ह्यात बंदी आदेश असताना व कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या संचार बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले आहे. बाबतचा अधिक तपास सहाय्यक फोजदार पाटील करत आहेत.
Previous Articleधर्मगुरूवरील खुनी हल्ल्याप्रकरणी संशयित महिलेला अटक
Next Article पुलाची शिरोलीत दूध विक्री बंद; मुलांचे हाल









