नवी दिल्ली
टाटा मोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार नेक्सन इलेक्ट्रिक वाहन (ईवी) ची विक्री 2,000 च्या घरात पोहोचली आहे. वाहन कंपनीने दिलेल्या एका माहितीनुसार मागील दहा महिन्यात नेक्सन ईवीच्या विक्रीने 2,200 ची संख्या पार केली आहे. व्यक्तिगत कार प्रकारांमध्ये मागील महिन्यांचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांगली मागणी राहिली आहे. कंपनीची सदर वाहन विक्री चालू वर्षातील ऑगस्टमध्ये 1,000 वर पोहोचली होती. कॉम्पॅक्ट एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकल्स) ची 1,000 युनिट इतकी विक्री केवळ तीन महिन्यात झाली आहे. टाटा मोर्ट्सने म्हटले आहे, की नेक्सन ईवीचा देशातील सर्वाधिक विक्री होणाऱया वाहनांमध्ये समावेश झाला आहे.