जवळपास 5 हजार कोटीचा निधी उभारणार – जून अखेरीस आयपीओ आणण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
निरमा कंपनीची सिमेंट शाखा नुवोको विस्टास कॉर्पोरेशन आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी सदर आयपीओ योजनेच्या माध्यमातून जवळपास 5 हजार कोटी रुपयाचा निधी उभारणार असल्याची माहिती आहे. कंपनीने सेबीजवळ यासंदर्भातील अर्ज सादर केला आहे. आयपीओमधून उभारण्यात येणाऱया रक्कमेचा वापर कंपनी कर्ज फेडण्यासाठी करणार असल्याची माहिती आहे. कंपनी जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैमध्ये इश्यू आणण्याचे संकेत आहेत.
निरमा देशातील प्रत्येक घराघरात ओळखला जाणारा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. अब्जाधीश उद्योगपती करसनभाई पटेल यांनी निरमा ग्रुपची सुरुवात केली होती. हा एक आयकॉनिक ब्रँड म्हणून ओळखला जात होता. देशातील स्टॉक एक्सचेंजमध्ये 2012 मध्ये डिलिस्ट केला होता. आता पुन्हा एकदा हा समूह आयपीओ आणण्याची तयारी करत आहे.
2007 मध्ये अंतिम कंपनी झाली लिस्ट
यापूर्वी सिमेंट कंपनी बुरनपूर सिमेंट नोव्हेंबर 2007 मध्ये लिस्ट झाली होती. याअंतर्गत 26 कोटी रुपयाचा निधी उभारला होता. त्याच वर्षी आणखी दोन सिमेंट कंपन्या लिस्ट झाल्या होत्या. बराक वॅलीने 23 कोटी आणि बिनानीने आयपीओतून 153 कोटी रुपये उभारले होते.









