यकृत, मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त : सरमळकर कुटुंबिय आर्थिक संकटात
वार्ताहर / मालवण:
मासेमारीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱया वायरी-भूतनाथ जाधववाडी येथील नीलेश अनंत सरमळकर या 40 वर्षीय तरुणाला यकृत व मूत्रपिंडाचा आजार झाला आहे. नीलेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी सरमळकर कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. नीलेश यांच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थेने आर्थिक मदत करावी, यासाठी सरमळकर कुटुंबियांनी आवाहन केले आहे.
वायरी भूतनाथ जाधववाडी येथील नीलेश अनंत सरमळकर हे मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरी आई, वडील, पत्नी, दोन मुली असे कुटुंब आहे. त्यांना पाच दिवसांपूर्वी यकृत व मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मालवणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या यकृत व मूत्रपिंडाला सूज आली असून कमरेत पाणी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आतापर्यंत त्यांच्या उपचारासाचाठी 40 हजार रुपये खर्च झाला आहे. परंतु पुढचा खर्च परवडणारा नसल्याने कुटुंबियांनी त्यांना घरी आणले आहे.
उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज
नीलेश यांना उपचारासाठी मेस्त रापण संघ, नारायण तोडणकर, भगवान लुडबे यांनी आर्थिक मदत केली आहे. परंतु, उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी नीलेश अनंत सरमळकर, बँक ऑफ इंडिया अकाऊंट नंबर-144910410001468 IFSC code-BKID0001449 खात्यावर मदत करावी, असे आवाहन अनिता सरमळकर यांनी केले आहे.









