सावंतवाडी / प्रतिनिधी:
केसरी येथील निवृत्त कृषी विस्तार अधिकारी श्रीपाद आत्माराम सोमण (७४) यांचे मंगळवारी १५ जून रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आरोंदा पंचक्रोशी परिसरात त्यांनी कृषी विस्तार अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. येथील योगेश्वरी कॅश्यु फॅक्टरीचे मालक योगेश सोमण यांचे ते वडील होत तर गावपुरोहित आनंद सोमण यांचे ते भाउ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.









