बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. लोकसभेच्या एका तर विधानसभेच्या दोन जागांसाठी मतमोजणी केली जात आहे. यामध्ये विधानसभेच्या दोन जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये एक भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. बेळगाव पोटनिवडणूक लोकसभेचा निकाल अद्याप बाकी आहे. दरम्यान निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रोटोकॉल व प्रतिबंधात्मक आदेश / कलम १४४ सीआरपीसी लागू असल्याने विजय उत्सव किंवा मिरवणूक काढता येणार नाही. कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने जर तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले आहे.