प्रतिनिधी / संगमेश्वर
धामापूर तर्फे संगमेश्वर गावचे प्रतिष्ठित नागरिक सुपुत्र पर्शराम ऊर्फ भाऊ शिगवण वय 57 यांचे आज पहाटे हृदयाविकाराने निधन झाले आहे. धामापूर वार्ड दोन मधून ते गाव पॅनलने निवडणूक लढवत होते.
शनिवार दि.9जानेला सकाळ पासून ते प्रचारासाठी आपल्या वार्डात फिरत असताना दुपारी त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना डेरवण हॉस्पिटलला दाखल केले. मात्र उपचार चालू असताना पहाटे त्यांचे निधन झाले. धामापूर गावचे माजी सरपंच, उपसरपंच, कायमस्वरूपी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष होते.
1992ला पंचायत समिती निवडणुकीत अवघ्या चोवीस मतांनी त्यांना पराभव झाला होता, ते सामाजिक, राजकीय, धार्मिक अनेक ठिकाणी कार्यरत असायचे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच आज धामापूर गावासह माखजन पंचक्रोशीत दुःखाचे सावट पसरले आहे.









