वार्ताहर/ सांबरा
निलजी ग्राम पंचायत निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱयांना संधी देत प्रस्थापित सदस्यांना दे धक्का कौल दिला.
एकंदरीत 22 सदस्यांपैकी तीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली. हे तिन्ही सदस्य निलजी गावचे नागरिक आहेत. उर्वरित 19 जागापैकी चुरशीची निवडणूक होऊन नव्या चेहऱयांना निलजी पंचायतीमध्ये स्थान मिळाले. निवड झालेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे निलजी येथील तीन वॉर्डातून सर्वश्री मधु बाबू मोदगेकर, रमेश वामन मोदगेकर, पल्लवी वसंत पाटील, रेखा वसंत मोदगेकर, विनंती हनुमंत गोमानाचे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजय मिळविला. तर मल्लव्वा बाबू सुतार, रमेश बाळकृष्ण सुतार व गजानन लक्ष्मण सुणगार यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिंदोळी कार्यक्षेत्रातील बाबागौडा पाटील, पिराजी रामू अनगोळकर, सविता मुचंडी, शीला तिप्पणगोळ, वीरभद्रया पुजार, नागेंद्र कुरबर, नंदिनी कुरबर, सागर मुचंडी, सतीश शहापूरकर, यल्लाप्पा शहापूरकर, गंगवा लक्ष्मण पुजारी, मिलन मोनेश म्हातारी, रेखा गंगाप्पा शहापूरकर, सविता तलवार, या उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून प्रतिस्पर्ध्यावर मात केली.









