प्रतिनिधी/ रत्नागिरी
संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्यात आलेल्या 268 एसटी कर्मचाऱयांपैकी दीडशे कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आह़े एकूण 265 कर्मचाऱयांनी सेवेत सामावून घेण्यासाठी अर्ज केला होत़ा तर अन्य 3 निवृत्त झाले आहेत़ उर्वरित कर्मचाऱयांना येत्या 2 दिवसात सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी विभागाकडून संपावर गेलेल्या कर्मचाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. या प्रकाराने संपकरी एसटी कर्मचाऱयांमधून संताप व्यक्त करण्यात आला होत़ा एसटी महामंडळाकडून होणारी कारवाई एकतर्फी असून कर्मचाऱयांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, असा आरोप संपात सहभागी कर्मचाऱयांकडून करण्यात आला होत़ा आता प्रशासनाकडून सरसकट सर्व कर्मचाऱयांना कामावर हजर करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आह़े
100 टक्के कर्मचारी कामावर हजर
निलंबित कर्मचारी वगळता 100 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ त्यामुळे जिह्यातील एसटी सेवा पूर्ववत झाली आह़े उन्हाळी सुटय़ा व मे महिन्याच्या हंगामात असलेली खरेदीची तयारी यामुळे प्रवाशांचा मोठा प्रतिसाद एसटीला मिळत आह़े मे महिन्यात मुंबई-पुण्यातील चाकरमानी रत्नागिरीत येत असतात़ त्यामुळे आता एसटी प्रशासनाकडून चाकरमान्यांसाठी बसचे नियोजन करण्याचे काम हाती घेण्यात येत आह़े
मागील 5 महिन्यांपासून चालणाऱया एसटी संपामुळे एसटी महामंडळाला प्रतिदिन सुमारे 70 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला होत़ा तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल़ा खासगी वाहतुकीमुळे प्रवाशांची लूट होत असल्याचेही समोर आले होत़े आता एसटी सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









