लहान मोठय़ा व्यवसायांवर कोरोनाच्या धास्ती : फिक्कीच्या अहवालात स्पष्टीकरण
नवी दिल्ली :
कोरोना महामारी आणि दुसऱया बाजूला संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला लॉकडाउनचा निर्णय यामुळे देशाची अर्थव्यवस्था कात्रीत सापडली आहे. यामुळे अनेक व्यवसाय संकटाचा सामना करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यात रेस्टॉरेंट, वाहन-रियल इस्टेट या सारख्या क्षेत्रांना पुन्हा उभे राहण्यासाठी आगामी एक दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचा दावा उद्योग संघटना फिक्की यांनी सादर केलेल्या एका अहवालातून केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कोविड19: आर्थिक प्रभाव आणि नुकसान कमी करण्याचे प्रयत्न या नावाचा एक सर्वेक्षणात्मक अहवाल तयार केला आहे. या अहवालात वरिल नोंदवलेल्या क्षेत्रासोबत वाहतूक , पर्यटन, लॉजिस्टिक्स, मंनोरंजन आणि कझ्युमर डय़ूरेबल्ससोबत अन्य क्षेत्रांना आपली नव्याने सुरुवात करण्यासाठी विलंब लागणार असल्याचे संकेत मांडले आहेत.
मागणीवर रिकव्हरी निश्चित

एकाद्या व्यवसायाची रिकव्हरी ही तेथील असणाऱया परिस्थितीवर आणि व्यवसाच्या उलाढालीवर निश्चित होत असल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणात दिलेल्या अनुमानाप्रमाणे अपॅरल ऍण्ड सौदर्य उत्पादन, बेव्हरेजेस, अल्कोहल बेव्हरेजेस, इन्शुरन्स, शेती, केमिकल, धातू आणि खाण क्षेत्र, सेवा, उद्योग, ऑफलाईन किरकोळ व्यवसाय आणि हेल्थकेअर या सारख्या क्षेत्रांना कोरोनाच्या फटक्मयातून उभा राहण्यासाठी वर्षाचा कालावधी लागण्याची शक्मयता व्यक्त केली आहे. म्हणजे वरिल व्यवसायाचे भविष्य मागणी व त्यातून मिळणाऱया उत्पन्नावरच निश्चित होत असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
आर्थिक मदतीची गरज
देशातील उद्योगाला कोरोनाच्या संकटातून सावरण्याचे असल्यास तत्काळ 9 ते 10 लाख कोटी रुपयाचे प्रोहोत्सानपर आर्थिक निधी मिळण्याची आवश्यकत असल्याचे म्हटले आहे. जो देशाच्या एकूण जीडीपीमधील 4 ते 5 टक्क्मयांचा हिस्सा होऊ शकतो. अहवालात म्हटले आहे, की अन्य देशात या प्रकारची उपाययोजना केली जात आहे.
अन्य क्षेत्रांवर प्रभाव
सेवा क्षेत्राप्रमाणे किरकोळ अन्न विपेते, दूरसंचार, युटिलिटी सेवा आणि फार्मास्यूटिकल्समधील शॉर्ट आदी क्षेत्राना उभा राहण्यासाठी जवळपास 6 ते 9 महिन्यांचा लांबचा कालावधी लागण्याचे अनुमान या अहवालातून व्यक्त करण्यात आले आहे.








