ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड क्विन कंगना राणावत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांच्या विषयी कंगनाने वादग्रस्त वक्तव्य करुन पंगा घेतला आहे. निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर कंगनाने संताप व्यक्त केला.
कंगना म्हणाली की, इंदिरा जयसिंगसारख्या स्त्रियांच्या पोटातून बलात्कारी जन्माला येतात. या अशा महिला आहेत ज्यांना बलात्कारातील आरोपींवर दया येते. अशा स्त्रियांना बलात्कारी आरोपींसोबत चार दिवस तुरुंगात ठेवलं पाहिजे.
इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईकडे आरोपींना क्षमा करण्यासाठीचं अपिल केलं होतं. दरम्यान, दिल्ली पटियाला हाउस न्यायालयाने निर्भया बलात्कारी प्रकरणातील चारही दोषींविरोधात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे.