सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्हयामध्ये पुरसदृश्य परिस्थिती असून सदरच्या काळामध्ये जीवनावश्यक आवेष्टीत वस्तूंची कमाल विक्री किंमतीपेक्षा (सर्व करांसहीत) जास्त दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा प्रकारे निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा ( एमआरपी ) पेक्षा जास्त दराने विक्री करत असलेल्या कुठल्याही आस्थापना, दुकाने आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे वैध मापनशास्त्र उपनियंत्रक श्रीम. जे. एस. पाटील यांनी कळविले आहे.
निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा ( एमआरपी ) पेक्षा जास्त दराने विक्री करत असलेल्या कुठल्याही आस्थापना/दुकान आढळल्यास पुढील दूरध्वनी, भ्रमणध्वनीवर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन वैध मापनशास्त्र उपनियंत्रक श्रीमती. जे. एस. पाटील यांनी केले आहे. अशा कारवाईसाठी नियुक्त केलेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र ०२३३-२६०००५३ (उपनियंत्रक वैध मापनशास्त्र कार्यालय, सांगली ), निरीक्षक वाय.एस. अग्रवाल ७७७५०७७७८७ (सांगली-०१विभाग), निरीक्षक एम.आर.जोशी ९३५९२२३७७४ (सांगली-०२ विभाग), निरीक्षक श्री. एस.डी. मनसुटे ९८९०५५१३०८ (मिरज विभाग) निरीक्षक श्री. एस. ए. अकोळकर ९४२३०४२४८७ ( तासगांव विभाग), निरीक्षक श्री. एम. आर. कांबळे ९८२२१०९१२६ (जत विभाग), निरीक्षक एम.आर. जोशी ९३५९२२३७७४ ( विटा विभाग ), निरीक्षक वाय.एस. अग्रवाल ७७७५०७७७८७ ( इस्लामपूर विभाग )
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








