ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची वचनपूर्ती चालू आर्थिक वर्षात केली जाणार आहे. 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यासाठी 2022-23 मध्ये 10,000 कोटी खर्च अपेक्षित आहे.
-जलसंपदा विभागाला 13 हजार 552 कोटी, दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
-उस्मानाबाद, गडचिरोलीमध्ये पाझर तलाव योजना
-मृत व जलसंधारण विभाग – 3 हजार 500 कोटी
-कृषी पंप – 60 हजार वीजजोडणीचे उद्दीष्ट
-गोसीखुर्द प्रकल्प : 853 कोटी 45 लाख रुपये निधी
-येत्या 2 वर्षात 11 सिंचनप्रकल्प पूर्ण करणार
-हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संसोधन केंद्र उभारणार
-महिला शेतकऱ्यांसाठी राखीव असलेली तरतूद 30 टक्क्यांवरून 50 टक्के
-2022-23 साठी कार्यक्रम खर्चासाठी कृषी विभागाला 3 हजार 25 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित
-मुख्यमंत्री शाश्वत निधी योजना, शेततळ्यासाठी अनुदानात 75 हजारापर्यंत वाढ








